वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी | Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi

Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi: नमस्कार मित्रांनो आज या लेखात वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी या विषयावर निबंध माहिती पाहणार आहोत.

या लेखाच्या माध्यमातून सरावासाठी काही मुद्दे येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

👉स्वच्छ गाव सुंदर गाव निबंध मराठी | Swach gaon sundar gaon nibandh

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी | Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

आपले जीवन सुखी, समृद्ध आणि संतुलित ठेवण्यासाठी वृक्षांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. ऑक्सिजन नसेन तर आपले पृथ्वीवर जीवन अश्यकच आहे.

झाडे मातीची ताकद टिकवून ठेवतात. हवा शुद्ध करतात, हवामान नियंत्रणात मदत करतात, आणि इतर अनेक मार्गांनी एकूण पर्यावरणाचा फायदा करतात. वृक्ष हे आपले सहकारी मित्रच नाहीत तर ते खरे सोबतीही आहेत. जे आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतात.

आपल्याला अनेक प्रकारची फळे, फुले आणि औषधेही केवळ झाडांपासूनच मिळतात. अनेक वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतात जे आपले आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. औषधी गुणधर्म असलेल्या झाडांच्या पानापासून, मुळांपासून वेगवेगळ्या आजारांवर औषधे मिळतात.

झाडे पर्यावरणाचेही सौंदर्य वाढवतात. पक्षी झाडांवर घरटी बनवतात. कडक उन्हात सावली देऊन कडक उन्हापासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात.

औद्योगिकरण आणि लोकसंख्येमुळे जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढत्या कंपण्यामुळे, शहरीकरणामुळे विकास तर होत आहे परंतु वृक्षतोडसुद्धा होत आहे. वृक्षतोड होत असल्यामुळे जंगले नष्ट होत आहे. प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. कडक उन्हाळा, जागतिक तापमान वाढ, प्रदूषण अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. वाहने, कांपण्यामधील धूर, विविध प्रकारचे विषारी वायू यांनी आपले वातावरण भरून जाते. झाडे हे विषारी वायू वातावरणात पसरण्यापासून रोखून पर्यावरण प्रदूषित होण्यापासून रोखतात.

पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. पर्यावरण संतुलनाच्या बाबतीत झाडांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जमिनीची धूप थांबण्यास मदत करतात त्यामुळे वृक्षारोपण करून मोठ्याप्रमाणात वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.

अलीकडे प्रदूषण ही मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे. इंधनाच्या ज्वलनामुळे, कंपन्यांनामधील वेगवेगळ्या वायूंमुळे, वृक्षतोडींमुळे जागतिक तापमानवाढ ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. वृक्ष हवा स्वछ ठेवण्यात मदत करतात.

वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमीकमी होत आहे. जिथे झाडे नाहीत तिथे पाऊस फार कमी पडतो. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी | Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi

या सर्व समस्यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर वृक्ष संवर्धन करून अधिकाधिक झाडे लावणे हाच एकमेव मार्ग आहे.

अलीकडच्या काळात वृक्षारोपण करण्याकडे जास्त भर दिला जातो. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे हे सांगितले जाते. अनेक संस्था, वन विभाग वृक्षारोपणाचे काम करत असतात.

आता लोकांकडून तसेच सरकारकडून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. शाळा- महाविद्यालयांध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम नियमितपणे राबवले जात आहेत.

वृक्षारोपणाचे अनेक छान प्रकल्प अलीकडे राबविले जातात या प्रकल्पात आपण सहभागी झाले पाहिजे. शाळा , कॉलेजमध्ये मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले पाहिजे. वृक्ष संवर्धन महत्त्व वेळोवेळी सांगण्यात आले आहे. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सध्या वृक्षारोपण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वृक्षांमुळे पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते. म्हणून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि आजूबाजूच्या लोकांनाही झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

तर मित्रांनो तुम्हाला “वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निबंध मराठी | Vruksha Samvardhan Kalachi Garaj Nibandh In Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू. आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.

Leave a Comment